प्रतिनिधी / वाळपई
सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर यानी धबधब्यावर पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश नुकताच दिलेला आहे. असे असतानाही रविवारी धबधब्याच्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना स्थानिक नागरिकांनी हाकलून लावण्याचा प्रकार घडला. यामुळे या गावातील ग्रामस्थानी नो व्हिजिटर्स ड्रॉईंग कोरोना या मिशनला सध्यातरी सुरुवात केल्याचे समजते.
सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा ठिकाणी पावसाळी मोसमात मोठय़ा प्रमाणात धबधबे कोसळत असतात. डोंगराच्या कपारीतून कोसळणाऱया या धबधब्यावर मौजमजा व आनंद लुटण्यासाठी राज्याच्या वेगवेगळय़ा भागातून पर्यटक येत असतात. गेल्या जवळपास पाच वर्षापासून येणाऱया पर्यटकांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यंदा मात्र कोरोना रोगाची महामारी असल्यामुळे याभागांमध्ये पर्यटकांना बंदी घालावी अशी मागणी वेगवेगळय़ा भागातील ग्रामस्थांनी केल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी आदेश नुकताच दिलेला आहे .सदर आदेशानुसार धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना येण्यास पूर्णपणे बंदी आहे. यासंदर्भाची दखल स्थानिक पोलिस व वनखात्याच्या यंत्रणेने घ्यावी असे निर्देश दिलेले आहेत. असे असताना कालपासून धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक स्वतःची वाहने घेऊन आले होते .मात्र त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी हाकलून लावण्याचा प्रकार घडला . गेल्या काही दिवसापासून नो टुरिस्ट डुरिंग कोरोना अशी मोहीम वेगवेगळय़ा भागातील ग्रामस्थांनी हाती घेतली असून त्याची अंमलबजावणी कारल रविवारपासून सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
ब्रम्हकरमळी, नगरगाव नागरिकांचा आक्रमक पवित्रा
दरम्यान रविवारी सकाळी पर्यटक ब्रह्मकमळ शेळपे धबधब्यावर येणार असल्याची चाहूल लागताच मोठय़ा संख्येने नगरगाव येथे ग्रामस्थ जमले होते. जवळपास 11 वाजण्याच्या सुमारास काही पर्यटक जीप गाडी घेऊन सदर भागातील धबधब्याच्या परिसरात आले असता त्यांना या ग्रामस्थांनी दम देऊन त्यांना हाकलून लावले. यामुळे नगरगाव भागात काही प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थामुळे या पर्यटकांना नाईलाजाने माघारी जावे लागले. यावेळी पंच सभासद पराग खाडिलकर व इतरांची मोठय़ा संख्येने उपस्थित होती.
सध्या कोरोना रोगाची महामारी असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव नगरगाव भागामध्ये फैलावू नये म्हणून ग्रामस्थानी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने उत्तर जिल्हाधिकाऱयांनी याठिकाणी पर्यटक येण्यास बंदी घातलेली आहे. तरीसुद्धा पर्यटक येण्याची चाहूल लागल्यामुळे ग्रामस्थानी स्वतः पुढाकार घेऊन नगरगाव याठिकाणी नाकाबंदी केली व आलेल्या पर्यटकांना पळवून लावले. सध्यातरी वाळपई पोलिस स्थानकाकडून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून येणाऱया काळात त्यांच्याकडून चांगली जबाबदारी पार पाडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पराग खाडिलकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सालेली, चरावणे, हिवरे, पाल आदी भागातील ग्रामस्थांनी सुद्धा नाकाबंदी करून पर्यटकांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. सदर ठिकाणी काही तुरळक प्रमाणात पर्यटक आले होते. त्यांना सुद्धा स्थानिक ग्रामस्थांनी हाकलून लावण्याचा प्रकार घडला. येणाऱया काळात बंदी असतानाही याभागातील धबधब्याच्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशाप्रकारचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .
दरम्यान ठाणे पंचायतीचे सरपंच प्रजिता गावस प्रजिता गावस यांनी ठाणे पंचायतीतर्फे अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आला असून पंचायत क्षेत्रातील पर्यटकांना धबधब्यावर येण्यासाठी मनाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.









