वाळपई प्रतिनिधी :
सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले व इतर भागामध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाण व्यवसाय भर पावसात सुरू आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठा होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केल्यानंतर सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार खाण संचालनालयाचे प्रतिनिधी पोलीस यांनी आज संयुक्ततरिता धाड घालून सदर भागातील मोठय़ा प्रमाणात मशिनरी जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवारी संध्याकाळच्या सत्रात करण्यात आली. यामुळे भागांमध्ये खळबळ निर्माण झाली असून येणाऱया काळात या भागांमध्ये चिरेखाणीचा व्यवसाय सुरू राहणार की बंद राहणार अशाप्रकारचा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. याबाबतची माहिती अशी की पिसुर्ले ग्रामीण क्षेत्रातील पिसुर्ले कुंभारखण पणशे आदी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात चिरेखणीचा व्यवसाय भर पावसामध्ये सुरू करण्यात आला होता. याकडे सरकारच्या संबंधित यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. सध्या मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असून चिकल सदृश्य पाणी चिरेखणीच्या माध्यमातून नैसर्गिक ओहोळामध्ये जात असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाचा ऱहास होत आहे. त्याचप्रमाणे या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर झाडांची कत्तल करण्यात आली असून या व नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करून सरकारी संबंधित यंत्रणेवर अंगुलीनिर्देश केले होते त्याचप्रमाणे स्थानिक पंचायत याकामांमध्ये पडद्यामागून पाठिंबा देत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. यासंदर्भातील वृत्त नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होते. या संदर्भात दखल घेऊन आज संध्याकाळी सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार ईशान सावंत यांच्या नेतृत्वाखाली खाण संचालनालयाचे प्रतिनिधी पोलीस खात्याचे प्रतिनिधी यांनी संयुक्तरीत्या या भागांमध्ये अचानकपणे धाड घातली. एकूण चार खणीवर धाड घालण्यात आली असून उपलब्ध माहितीनुसार जवळपास चार चिरे काढण्याची मशीन व एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे .यासंदर्भात सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार ईशांत साव ??त याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बेकायदेशीर खाणी सुरू असल्याची माहिती व तक्रारी आल्यानंतर त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे .सदर भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात चिरेखाणी सुरू असून भर पावसात या चिरेखाणीचा व्यवसाय म्हणजे नागरिकांच्या व पर्यावरणाच्या मुळावर उठलेला आहे. यामुळे बेकायदेशीररित्या पर्यावरणाचा ऱयास करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे .
या कारवाई अंतर्गत चार खाणीवर धाड घालण्यात आली असून काम सुरू असताना एकूण चार मशीन ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे चिरेखणीचा व्यापक विस्तार करण्यासाठी वापरण्यात आलेले जेसीबी मशीन ताब्यात घेण्यात आलेले आहे .त्याच प्रमाणे एकूण मिळालेल्या माहितीनुसार मोठय़ा प्रमाणात चिरे जप्त करण्यात आले असून यासंदर्भात ताबा खाण संचालनालयाकडे देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जप्त करण्यात आलेले मशिनरी व जेसीबी मशीन स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे .
दरम्यान आज संध्याकाळी या भागातील बेकादेशीर खाणीवर घाड घालणार असल्याचा सुगावा मिळताच अनेक चिरेखाणीवाल्यानी मशिने ताबडतोब सदर परिसरातून बाहेर काढल्याची चर्चा वर्तविण्यात येत आहे. याधाडीचा सुगावा कोणी दिला यासंदर्भातही चर्चा होताना दिसत आहे. पिसुर्ले पंचायत क्षेतामध्ये जवळपास वीस पेक्षा जास्त चिरेखाणी असून याकडे पोलिस व पंचायत का दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारचा सवाल सध्यातरी नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. त्याप्रमाणे खाणीवरील घालण्यात आलेल्या धाडीचे अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी बेकायदेशीर खाण यासंदर्भातील तक्रार 23 जून रोजी मामलेदार कार्यालयांमध्ये दिली होती. त्या संदर्भात दखल घेऊन या चिरेखाणी धाड घालण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे या भागात येणाऱया काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर खाणी सुरू झाल्यास त्याला सरकारची यंत्रणा पूर्णपणे जबाबदार राहणार असल्याचे हनुमंत परब यांनी स्पष्ट केले आहे.









