वाळपई / प्रतिनिधी
शनिवार दि. 12 रोजी होणाऱया जिल्हा पंचायत निवडणुकीमधून सत्तरी तालुक्मयातील तीन मतदारसंघांमध्ये एकूण 46,464 मतदान मतदानामध्ये भाग घेणार आहेत. यात 23,047 पुरुष मतदार, 23,417 महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण झाली असून सत्तरी तालुक्मयातील तिन्ही मतदारसंघात मतदान यंत्रणा सज्ज झालेली आहे. त्यामुळे मतदारांनी मोठय़ा प्रमाणात मतदान करावे व आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन सत्तरी तालुक्मयाचे निवडणूक अधिकारी तथा सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी केले आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सत्तरी तालुक्मयातील केरी, होंडा व नगरगाव या तीन मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया होणार आहे. यात नगरगाव मतदारसंघातून 28 मतदान केंदे, होंडा मतदारसंघामधून 24 मतदान केंदे व केरी मतदारसंघामधून 28 मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेच्या माध्यमातून होणार असून सत्तरी तालुक्मयातील एकूण नऊ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
केरी मतदार संघ
केरी मतदारसंघातून भाजपातर्फे देवयानी गावस, काँग्रेस पक्षातर्फे परिणिता राणे, नगरगाव मतदारसंघातून भाजपातर्फे राजश्री काळे, काँग्रेसतर्फे उषा मेस्त तर होंडा मतदारसंघातून भाजपातर्फे सगुण वाडकर, काँग्रेस पक्षातर्फे रमेश गावडे, आम आदमी पक्षातर्फे पुंडलिक माडकर, गणपत गावकर व गुरुदास गावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. या तीन मतदारसंघातून एकूण उमेदवारांची संख्या नऊ आहे.
केरी मतदार संघ
केरी मतदारसंघात एकूण चार ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. यात केरी, मोर्ले, म्हाऊस व ठाणे ग्रामपंचायतीचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार एकूण 28 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया हाती घेण्यात येणार असून केरी ग्रामपंचायतीत 5243 मतदार मतदानात भाग घेणार आहेत. ठाणे ग्रामपंचायतीमधून 4471, म्हाऊस ग्रामपंचायतीमधून 3404 व मोर्ले ग्रामपंचायतीमधून 2764 मतदार मतदानामध्ये भाग घेणार आहेत.
या मतदारसंघातून भाजपा व काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. भाजपतर्फे देवयानी गावस तर काँग्रेस पक्षातर्फे परिणिता राणे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
नगरगाव मतदार संघ
नगरगाव मतदारसंघात एकूण 5 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. यात नगरगाव, सावर्डे, गुळेली, खोतोडा व भिरोंडा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या मतदारसंघात काँग्रेस-भाजपामध्ये थेट लढत होणार आहे. भाजपतर्फे राजश्री काळे तर काँग्रेसतर्फे उषा मेस्त यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार एकूण 15,441 मतदार मतदानात भाग घेणार आहेत. यात नगरगाव ग्रामपंचायत 3852, सावर्डे ग्रामपंचायत 2501, खोतोडा ग्रामपंचायत 3625, गुळेली ग्रामपंचायत 2475, भिरोंडा ग्रामपंचायतीत 3188 मतदारांचा समावेश आहे.
होंडा मतदार संघ
होंडा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. एकूण पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात भाजपतर्फे सगुण वाडकर, काँग्रेसतर्फे रमेश गावडे, आम आदमी पक्षातर्फे पुंडलिक माडकर, गणपत गावकर व गुरुदास गावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. या मतदारसंघांमध्ये एकूण 14941 मतदार मतदानामध्ये भाग घेणार असून 4474 पुरुष मतदार तर 7467 महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण प्राप्त माहितीनुसार या मतदारसंघात एकूण चार ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे यात होंडा, पिसुर्ले, पर्ये व हरवळे ग्रामपंचायतीच्या काही भागांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 14941 मतदार यामध्ये भाग घेणार असून यात होंडा ग्रामपंचायत 6947, पर्ये ग्रामपंचायत 3419, पिसुर्ले ग्रामपंचायत 2540 तर हरवळे ग्रामपंचायतीत 1875 मतदारांचा समावेश आहे.









