साटे येथील युवा शेतकरी श्याम गावकर यांची जिद्द फळाला
उदय सावंत/साटे
सत्तरी तालुक्मयाच्या भूक्षेत्रात आतापर्यंत पारंपरिक शेतीचा व्यवसाय विकसित झालेला आहे. खरीप व रब्बी पिकाच्या माध्यमातून या भागातील शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह परत पुढे नेताना दिसत आहेत .या भागातील नद्यांच्या शेजारी उभी राहिली कुळागरे यामध्ये नारळ सुपारी केळी आदी उत्पादनांच्या माध्यमातून कृषी विकासाला चालना मिळताना दिसत आहेत. मात्र हल्लीच्या दमाचे युवा शेतकरी आता वेगवेगळय़ा प्रकारच्या शेती प्रयोगाकडे होऊ लागलेले आहेत. सत्तरी तालुक्मयातील अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या साटे गावातील युवा शेतकरी शाम गावकर यांनी स्ट्रॉबेरी लागवड करून ती यशस्वी केलेली आहे .सध्या त्यांच्या शेतीमध्ये स्ट्रॉबेरीच्या पिकाला सुरुवात झाली असून येणाऱया जवळपास महिनाभरात संपूर्ण शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणात स्ट्रॉबेरी निघणार आहे .आता हळूहळू या पिकाला सुरुवात झाल्याचे सदर भागाचा फेरफटका मारला असता निदर्शनास आले.
आतापर्यंत स्ट्रॉबेरी सारखे उत्पादन हे देशातील महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी होऊ शकते अशा प्रकारचा आपला समज होता. सत्तरी तालुका हा पूर्णपणे गर्द झाडीने वेढलेला आहे. यामुळे या भागांमध्ये निर्माण होणारी थंड हवा याच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकते अशा प्रकारचा विचार मनात पक्का करून साटे येथील शाम गावकर यांनी यंदा स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. गोवा राज्याच्या कृषी खाते व वाळपई येथील विभागीय कृषी कार्यालयाच्या अधिकाऱयांकडून मिळणाऱया प्रोत्साहनाचे बळावर त्यांनी हे धाडस केले .आवश्यक स्वरूपाची पूर्वतयारी करून स्ट्रॉबेरीचे लागवड करण्यात आली.
दीड महिन्यापूर्वी केले होते लागवड
यासंदर्भात शाम गावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की दीड महिन्यापूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. आवश्यक स्वरूपाची पूर्वतयारी करून व शेतीची मशागत करून या संदर्भातील लागवड करण्यात आली. अनेक प्रकारच्या समस्यांना समर्थपणे तोंड देत ही लागवड आता हळूहळू यशस्वी होऊ लागल्याचे समाधान आपणास वाटत असल्याचे शाम गावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. स्ट्रॉबेरी हे पीक आपल्या देशामध्ये आधुनिक शेतीच्या व्यवसायात मोडत असते.सत्तरी तालुका यासारख्या पारंपारिक शेती विकसित करणाऱया भागांमध्ये अशा प्रकारचे पीक होऊ शकते याबद्दल आजही आपल्याला विलक्षण वाटत असल्याचे श्याम शाम गावकर यानी संवाद साधताना स्पष्ट केले.
सहा महिन्यांचे पीक.
सध्या महाराष्ट्रातील महाबळेश्वर भागांमध्ये या पिकाला सुरुवात झालेली आहे. तर दुसऱया बाजूने सत्तरी तालुक्मयात या लागवडीला फळधारणा होऊ लागलेली आहे .शाम गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यापर्यंत यासंदर्भात पीक मिळू शकते .आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने लागवड केलेली आहे त्याच माध्यमातून येणाऱया काळात याच झाडांचा वापर करून लागवडीचा विस्तार करण्याचा आपला विचार असल्याचे शाम गावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. श्याम गावकर हरहुन्नरी व्यक्तिमत्व अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देत त्यांनी आतापर्यंत गोव्यामध्ये एक प्रगतशील युवा शेतकरी म्हणून प्रतिमा निर्माण केलेली आहे. कृषी खात्याचा यंदाचा युवा शेतकरी म्हणून पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत आपल्या मातीमधून वेगवेगळय़ा प्रकारचे तंत्र विकसित करताना आधुनिक स्वरूपाचे लागवड करण्याचा त्यांची जिद्द यामुळेच ते आज स्ट्रॉबेरी सारखे लागवडीमध्ये यशस्वी होऊ लागलेली आहेत.
बाजारपेठीची चिंता करण्याची गरज नाही.
सध्या साटे भागातील बारामाही वाहणारा धबधबा देशी त्यात प्रमाणात परदेशी पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या जवळपास दोन महिन्यापासून मोठय़ा प्रमाणात पर्यटक या भागांमध्ये या धबधब्याचे रूप पाहण्यासाठी येऊ लागलेली आहेत. या धबधब्यावर जाण्यासाठी रस्त्याचा वापर होत आहे .त्या रस्त्याच्या बाजूलाच श्याम गावकर यांची स्ट्रॉबेरीची शेती आहे .यामुळे चांगल्याप्रकारे पिकाचे उत्पन्न आल्यानंतर बाजारपेठ शोधण्याची गरज नाही. कारण देशी विदेशी पर्यटक हमखासपणे या फळांकडे आकर्षित होऊ शकतो असे शाम गावकर यांनी स्पष्ट केले. सत्तरी तालुक्मयाच्या मातीमध्ये एक वेगळय़ा प्रकारची गोडी आहे. या गोडीचा स्वाद निश्चित प्रमाणात स्ट्रॉबेरीच्या फळांमध्ये येणार व वेगवेगळय़ा प्रकारचा फळाची निर्मिती या भागामध्ये होणार अशा प्रकारच्या विश्वास शाम गावकर यांनी व्यक्त केलेली आहे.
श्याम गाककर धडपडी व प्रयोगशील शेतकरी–विश्वनाथ गावस. फोटो.
या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वाळपईचे विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस त्याने सांगितले की शाम गावकर हे जरी ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व असले तरीसुद्धा गावातील निसर्गाची सानिध्यात राहणारे हे व्यक्तिमत्व आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानासुद्धा त्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करून ते यशस्वी करून दाखविले आहेत .सध्या त्यांनी स्ट्रॉबेरी बरोबरच कारले मिरची दोडकी काकडी त्यांची विशिष्ट अशी लागवड केलेली आहे .सत्तरी तालुक्मयातील प्रयोगशील युवा शेतकरी म्हणून शाम गावकर यांची वाटचाल खरोखरच येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयाच्या कृषी विकासाला एक वेगळय़ा प्रकारचा आयाम देणारी ठरणार आहे यात अजिबात दुमत नाही.









