चंदगड प्रतिनिधी
गेले चार दिवस सतत धुके पडत असून काजू व आंबा पीकांचा मोहोर काळा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
शेतकऱ्याचा आधारवड म्हणून काजू पिकाची तालुक्मयात ओळख आहे. काजू पिकातून घरचे एखादे मोठे काम होऊन जाते. गाठीला चार पैसे शिल्लक राहतात. त्यामुळे काजू पिकाकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. चंदगड तालुका हा घाटमाथ्यावरचा असल्याने वेळोवेळी धुक्मयांला सामोरे जावे लागते. त्यामुळे आलेला कोवळा मोहर व काजुला पडलेली तोरं गळून जात आहेत. त्यामुळे उत्पन्नात घट येऊन शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यावर उपाय योजना करण्यासाठी शेतकरी कृषी विभागाशी संपर्क साधून वेगवेगळे प्रयोग करत आहे. शेतकऱ्यांनी परिसरातील असलेली माळ जमिनीचे सपाटीकरण करून घेत बांध मारून वेगवेगळय़ा प्रकारच्या जातीची काजूची झाडे लावली आहेत. सुरवातीची दोन-तीन वर्ष झाडाची काळजी घेतली की नंतर उत्पन्न मिळते. विनाखर्चिक काजू उत्पन्न म्हणून काजू नजरेसमोर ठेवून या पिकाची लागवड केली जात आहे. पण वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि पडणारे धुके यामुळे लावलेली झाडे उन्मळून पडत आहेत. उभ्या असलेल्या झाडांचा धुक्मयामुळे मोहर गळून पडत आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत भर पडत असून उत्पन्न घटणार असल्याचे बोलले जात