शिरोळ / प्रतिनिधी
येथील दत्तनगर भागातील स्वाती सुरेश बांगर (वय ३६, रा. दत्तनगर ) या विवाहितेने आजारास कंटाळून राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत शिरोळ पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, स्वाती बांगर या महिलेने राहत्या घरी छतावरील पंख्यास साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबतची वर्दी पती सुरेश बांगर यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत .









