24,000 वर विक्रीचा आकडा – पर्यावरण संरक्षणाकडे ग्राहकांचा कल
नवी दिल्ली
हिरो इलेक्ट्रिकची (1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर) या सणासुदीच्या कालावधीत किरकोळ विक्री मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत दुप्पट झाली असून विक्रीचा आकडा हा 24,000 वर पोहोचला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
ग्राहकांची दोन गोष्टींना पसंती
चालू सीझनमध्ये मात्र ग्राहकांनी मात्र पेट्रोल इंधनाऐवजी इतर पर्यायी दुचाकींना पसंती दर्शवली. यामध्ये मोठय़ा प्रमाणात ग्राहकांनी पेट्रोलच्या दुचाकी ऐवजी हिरोच्या ई बाईकला प्राधान्य दिले आहे. तसेच ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात पर्यावरण व टिकाऊच्या क्षमतेत या प्रकारच्या दुचाकींना पसंती दिल्याचे हिरो इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.









