ऑनलाईन टीम / शिमला :
आगामी येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, हिमाचल प्रदेश सरकारने आंतर राज्यीय बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत माहिती देताना परिवहन मंत्री विक्रम सिंह यांनी सांगितले की, येणाऱ्या सणांच्या निमित्ताने सरकारने बुधवार पासून आंतर राज्यीय बस सेवा सुरू केली जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, पठाणकोट, चंदीगड, लुधियाना, जालंधर आणि हरिद्वार ला जाण्यासाठी बुधवार पासून आंतर राज्यीय बस सेवा सुरू होईल. एच आर टी सी बसे या शहरात चालवली जातील. या बसेसचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. अन्य शहरात बस सेवा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.









