वार्ताहर / सडोली खालसा
सडोली खालसा तालुका करवीर येथे आज 65 वर्षीय महिलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून या बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सत्तावीस लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच सडोली खालसा गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे.
ही महिला सांगाव ता.कागल. येते आपल्या नातेवाईकाकडे गेली होती तिथेच संबंधित नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या महिलेचा स्वॅब तपासणीचा देण्यात आला होता. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यानंतर फेर तपासणी अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला. यामुळे संबंधित महिलेच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
हसूर दूमाला. प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. टी. पोळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सर्वे व तपासनी करण्यात आली. ग्रामपंचायत.पोलीस पाटील. दक्षता समिती यांनी खबरदारी घेतली असून गावात औषध फवारणी करण्यात आली तसेच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.
Previous Articleलॉकडाऊन काळात नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे – नगराध्यक्ष वडगाव नगरपरिषद
Next Article बामणीत तरूणी कोरोना पॉझिटिव्ह








