प्रतिनिधी / पणजी
पर्वरी येथील सचिवालयातील कर्मचारी, अधिकाऱयांनी कोरोनाची धास्ती घेतली असून कोरोनाचा धोका वाढत असल्याने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. काल बुधवार या सर्वांनी सचिवालयाच्या संकुलातील मोकळ्या जागेत एकत्र येत कामावर बहिष्कार घातला.
सचिवालयातील सुमारे 12 कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित सापडले असूनही येणाऱयांची तपासणी केली जात नाही, एसओपी नाही आणि कोणतीच उपाययोजना केली जात नाही, अशी तक्रार कर्मचाऱयांनी केली आहे. योग्य ती तपासणी करून एसओपी राभविण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान एकत्र आलेल्या कर्मचारी, अधिकाऱयांनी मुख्यसचिवांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भेट झाली की नाही याबाबत कळाले नाही.