वृत्तसंस्था/ मुंबई
रायपूरमध्ये 2 ते 21 मार्च दरम्यान होणाऱया अनअकादमी रोड सेफ्टी विश्व टी-20 क्रिकेट मालिकेत क्रिकेट क्षेत्रातील विविध देशांचे माजी क्रिकेटपटू पुन्हा मैदानावर खेळताना शौकिनांना पाहण्याची संधी लाभणार आहे.
रायपूरमध्ये होणाऱया या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विंडीज ब्रायन लारा आणि लंकेचा मुरलीधरन भाग घेणार आहेत. गेल्यावर्षी पहिल्यांदा आयोजलेली ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे चार सामन्यानंतर रद्द करण्यात आली होती. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. सदर स्टेडियम नव्याने बांधण्यात आले असून त्याची क्षमता 65000 शौकिनांची आहे. सुनील गावस्कर यांच्या पीएमजी आणि महाराष्ट्राच्या रोड सेफ्टी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा भरविली जात आहे. सचिन तेंडुलकर या स्पर्धेचे ब्रॅड ऍबेसेडर आहे.









