मुंबई \ ऑनलाईन टीम
अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरण हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं या दोघांना 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. तसेच त्या गाडीचे मालक मनसूख हिरण यांच्या अनाचक झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वाझेंच्या युनिटमधील एपीआय रियाझुद्दीन काझी यांनाही या प्रकरणातील पुरावे मिटवणे, प्रकरणाची माहिती असून देखील सहकार्य केल्याचा आरोप ठेवत अटक झाली आहे. 5 मे रोजी या दोघांची न्यायालयीन कोठडी संपत होती. शुक्रवारी या दोघांनाही न्यायाधीश राहुल भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आलं. तेव्हा, न्यायालयाने दोघांच्याही कोठडीत वाढ करत त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Previous Articleसांगली : मनपा शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शनविना हाल; दोन महिने थांबलेली पेन्शन तात्काळ द्या
Next Article कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू…खरं काय?








