जिल्हा समान्य रुग्णालयातील केंद्रावर, 181, 229039 वर संपर्क करा
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी-
हिंसाग्रस्त महिलेला एका छताखाली समुपदेशन, कायदेविषयक, वैद्यकीय, पोलीस यंत्रणाविषयक, वास्तव (आधार) प्रकारच्या सेवा तात्काळ आवश्यकते प्रमाणे उपलब्ध करुन देण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला व बाल विकास विभाग केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वीत आहे. पीडित महिलांनी 181, 02362-229039 या वर संपर्क करावा. त्यांना मदत दिली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.









