दिवसभरात 1.73 लाख नवे बाधित ः 2.84 लाख रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱया रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 84 हजार 601 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 3 हजार 617 रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 22 लाख 28 हजार 724 पर्यंत खाली आली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या मंदावत असल्यामुळे दिलासादायक वातावरण आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 77 लाख 29 हजार 247 इतकी आहे. तर आतापर्यंत 3 लाख 22 हजार 512 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून 2 कोटी 51 लाख 78 हजार 11 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, भारतात आतापर्यंत लसीकरणाचे 20 कोटी 89 लाख 02 हजार 445 डोस देण्यात आले आहेत.









