शाहू महाराज करणार मार्गदर्शन, मराठा आरक्षणासह विविध मुद्यांवर चर्चा
प्रतिनिधी/कोल्हापूर
सकल मराठा समाजाच्या गुरूवारी (दि. 15) होणाऱया जिल्हास्तरीय महत्वपूर्ण बैठकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मार्गदर्शन करणार आहेत. ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात सकाळी 11 ते 2 या वेळेत ही बैठक होणार असून यावेळी जिह्यातील बारा तालुक्तील प्रमुख समन्वयक, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक इतर जिह्यातील प्रतिनिधी यांच्यासह खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शाहू महाराज करणार मार्गदर्शन
सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी न्यू पॅलेस येथे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांना गुरूवारच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याविषयी विनंती केली. मराठा आरक्षण, सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासह मराठा समाजातील इतर विषयांवर विस्तृत चर्चा केली. यावेळी कोणताही निर्णय घेताना नियोजनपूर्वक घ्या. मराठा आरक्षणप्रश्नी पूर्णपणे पाठीशी आहे, असे छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी सांगितले.
पुढील आंदोलनाची दिशा ठरणार
कोरोनाच्या सर्व नियम, अटींचे पालन करून ही बैठक घेण्यात येणार आहे. आरक्षणासाठी बलिदान देणाऱया मराठा बांधवाना अभिवादन केल्यानंतर आरक्षण पोवाडा, व आचारसंहिता वाचून बैठकीस सुरूवात होणार आहे. आंदोलन रणनीती आरक्षण स्थगिती व त्या नंतर प्रवेश प्रक्रिया,रखडलेल्या नियुक्ती, सारथी संस्थेची स्वायतत्ता, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी मुद्दÎांवर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे.