आरक्षणप्रश्नी सरकारचे वेधणार लक्ष : ग्रामपंचायत, तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार निदर्शने
प्रतिनिधी / कोल्हापूर
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे यासह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने शुक्रवार 16 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, तालुक्यातील तहसिदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
या संदर्भात कोल्हापूर जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे ः भारतीय राज्य घटनेतील एसटी परिशिष्टात 36 व्या क्रमांकावर धनगर समाजा हा भारतातील मूळ आदिम जमात असल्याची नोंद आहे. त्यांचे पूजा विधीही वेगळे आहेत, असे असूनही तांत्रिक संदर्भहीन अडचणी उपस्थित करून धनगर समाजाचे आरक्षण नाकारले जाते. राज्यातील ठाकरे सरकार धनगर समाजाला न्याय देईल, अशी अपेक्षा ओह. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण दिल्यानंतरच भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी आहे. या सर्व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सकल धनगर समाजाचे सर्व कार्यकर्ते ग्रामपंचायत, तहसिदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्रित येऊन सरकारचे लक्ष वेधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेत आंदोलन केले जाणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









