64 टक्के जणांना श्वसनावेळी त्रास : हृदय, मूत्रपिंडावरही होतोय प्रभाव
कोरोनतून बरे होणाऱया 64 टक्के रुग्णांमध्ये अनेक महिन्यांपर्यंत विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. उपचारानंतरच रुग्ण श्वास घेण्यास त्रास, थकवा, अस्वस्थपणा आणि नैराश्याला तोंड देत आहेत. संक्रमण झाल्याच्या 2 ते 3 महिन्यांनी हे परिणाम दिसून येत आहेत. 64 टक्के रुग्ण श्वास घेण्याच्या त्रासाला तोंड देत होते, तर 55 टक्के थकव्याला सामोरे जात होते असे ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे.
फुफ्फुसांवर परिणाम
रुग्णांचे एमआरआय केले असता कोरोनाच्या 60 टक्के रुग्णांचे फुफ्फुसांमध्ये प्रभाव दिसून आला. 29 टक्के रुग्णांच्या मूत्रपिंडांमध्ये समस्या दिसून आली. तर 26 टक्के जणांमध्ये हृदयाशी संबंधित तर 10 टक्के जणांमध्ये यकृताशी संबंधित समस्या आढळून आली आहे.
अवयव निकामी अन् सूज
रुग्णांमध्ये एब्नॉर्मेलिटी दिसून येत आहे. याचा थेट संबंध अवयवांच्या सूजशी आहे. अवयवांमध्ये तीव्र सूज आणि अवयव निकामी होण्यातील कनेक्शन मिळाले आहे. सूजच अवयवांना हानी पोहोचविण्याचे काम करत आहे. कोरोनातून बरे होणारे रुग्ण यालाच तोंड देत आहेत, असे रमण यांनी सांगितले आहे.
लाँग कोविड
रुग्ण बरे झाल्यावरही पूर्वीप्रमाणे तंदुरुस्त दिसून येत नाहीत. शरीराच्या विविध हिस्स्यांमध्ये कोरोनाचा दीर्घकाळापर्यंत प्रभाव दिसून येत असल्याचे ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ रिसर्चने मागील आठवडय़ात म्हटले होते.









