नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. अधिवेशनात शेतकरी आंदोलन, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच कृषी कायद्यांविरोधात शिरोमणी अकाली दलाचं संसदेबाहेर आंदोलन देखील सुरू आहे.
तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शिरोमणी आकाली दलाच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं आहे. देशातील शेतकऱ्यांना न्याय हवा आहे. सर्व पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात उभं राहावं आणि कायदा परत घेण्यावर त्यांच्यावर दबाव टाकावा, असं शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









