ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेगासस, वाढती महागाई, कृषी कायदा या मुद्यांवरुन संसदेत विरोधकांकडून गदारोळ सुरू आहे. त्यामुळे मागील 13 दिवसात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज 107 तासांपैकी केवळ 18 तास चालले. परिणामी करदात्यांचे 133 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले आहे. तेव्हापासून विरोधक दोन्ही सभागृहात पेगासस, महागाई आणि कृषी कायद्यावरून गदारोळ घालत आहेत. त्यामुळे अनेकदा सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागत आहे. राज्यसभेचे कामकाज निर्धारित वेळेच्या 21 टक्के तर लोकसभेचे कामकाज 13 टक्के चालले आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहात मागील 13 दिवसात 107 तासांपैकी केवळ 18 तास काम झाले आहे. 89 तासांचे संसदेचे नुकसान झाले आहे. संसदेचे हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.









