प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात पोलिसांचे पथसंचलन झाले. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन झाले. संगमेश्वरनगर, शाहूनगर, अन्नपूर्णावाडी, अझमनगर परिसरात पोलिसांनी पथसंचलन केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून पोलिसांचे पथसंचलन सुरू आहे. मार्केट, खडेबाजार, शहापूर, टिळकवाडी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात यापूर्वीच पोलिसांनी शक्तिप्रदर्शन केले आहे.









