मानुषी छिल्लरने व्यक्त केली भूमिका
माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटातून पदार्पण करणारी मानुषी छिल्लर सध्या चर्चेत आहे. चित्रपटात राजकुमारी संयोगिता ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी स्वतःवर मोठी मेहन करावी लागल्याचे तिने म्हटले आहे.
पृथ्वीराज हा चित्रपट मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याने आनंद आहे. मी अशाप्रकारच्या पदार्पणासाठी स्वतःला सुदैवी समजते. मिळालेल्या संधीसोबत न्याय केल्याची अपेक्षा असल्याचे तिने मुलाखतीत नमूद केले आहे.
संयोगिता साकारण्यासाठी मोठी मेहनत केली आहे. ही एक मोठी जबाबदारी होती आणि मी चित्रपटात कशी दिसतेय याबद्दल लोक कौतुक करत असल्याने मला आनंद आहे. पडद्यावर मोठी खरी परीक्षा होणार असल्याने लोक मलाही पसंत करतील अशी अपेक्षा असल्याचे ती म्हणाली.

10 जूनला प्रदर्शित होणार
चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या दिग्दर्शनात तयार हा चित्रपट निडर, पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांचे जीवन आणि शौर्यावर आधारित आहे. चित्रपटात अक्षय कुमार हा पृथ्वीराज यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर मानुषी ही संयोगिता यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. याचबरोबर संजय दत्त, सोनू सूद आणि मानव विज देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील.









