ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळावर दोन वर्षांसाठी हंगामी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे. या मंडळावर हंगामी सदस्य म्हणून निवड होण्याची भारताची ही आठवी वेळ आहे.
संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळावर 15 देश हंगामी सदस्य म्हणून निवडण्यात आले आहेत. नियमानुसार प्रत्येक देशाला या मंडळाचा महिनाभरासाठी अध्यक्ष होण्याची संधी मिळत असते. भारताला ऑगस्ट 2021 मध्ये या मंडळाचा अध्यक्ष होण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर 2022 मध्येही महिनाभरासाठी संधी मिळेल.
अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या या सुरक्षा मंडळात भारताबरोबरच केनिया, आयर्लंड, नॉर्वे, आणि मेक्सिको या देशांचाही समावेश आहे. शनिवारपासून भारताचे या मंडळावरील सदस्यत्व सुरू झाले आहे.









