ऑनलाईन टीम
मराठा समाजाच्या राज्य सरकारच्या आखत्यारित येणाऱ्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी उद्याच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी यावे. चर्चेतून मार्ग काढूया, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. सरकरचा प्रतिनिधी म्हणून हे आवाहन करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या आखत्यारित येणाऱ्या सर्व विषयांवर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. सारथीचा प्रश्न, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी. ही भेट घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पाटील यावेळी म्हणाले.









