नवी दिल्ली/प्रतिनिधी
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार देशातील विविध भागात बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पावसाने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबलं आहे. यामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपरी यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानात पाणी शिरलं आहे. आजही (गुरुवार) दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. ५९ लोधी इस्टेट येथील संभाजीराजे यांच्या बंगल्यात पावसाचं पाणी शिरल आहे.
लोधी इस्टेट हा खासदारांच वास्तव्य असलेला व्हीआयपी परिसर आहे. मात्र याठीकाणी सुद्धा दोन दिवस पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाने खासदार संभाजीराजेंच्या बंगल्यामध्ये बेडरुम, किचनसहीत सगळीकडे पाणी तुंबळ आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या भेटीसाठी संभाजीराजे मध्यरात्री दिल्लीत पोहचले त्यावेळी कालची रात्र ही पाण्यातचं काढावी लागली.
संभाजीराजे यांनी, “राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. त्यामुळे काल मध्यरात्री दिल्लीत पोहचलो. तेव्हा पाऊस नव्हता. याआधी दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पाणी शिरंल आहे. पहाटे ६ वाजता पुन्हा पाणी शिरल्यामुळे सर्वांची पळापळ सुरु झाली. खालून ड्रनेजमधून हे पाणी आत शिरलं. त्यामुळे हॉलमध्ये सोफ्यावर रात्री काढावी लागली. दिल्लीतील हा पहिलाचं अनुभव आहे.” असे संभाजीराजे एका वृत्त वाहिनीही बोलताना म्हणाले.