वृत्तसंस्था / भोपाळ
मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये धावत्या रेल्वेत बलात्काराची घटना घडली आहे. हा प्रकार दिल्लीतील 21 वर्षीय युवतीसोबत पँट्री कारमध्ये घडला आहे. पँट्री कार मॅनेजरने शुक्रवारी रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडित युवतीने रेल्वे पोलिसांना सांगितले आहे. आरोपी भूपेंद्र तोमरला रेल्वे पोलिसांनी झाशी रेल्वे स्थानकारून ताब्यात घेतले आहे. तो रेल्वेच्या दुसऱया डब्यात लपून बसला होता. आरोपी हा भिंडचा रहिवासी आहे. इटारसीमध्ये रेल्वेला थांबा नाही.









