प्रतिनिधी /पेडणे
महाराष्ट्राच्या नारदिय कीर्तन परंपरेतील ख्यातनाम कीर्तन कार ,कीर्तन मंजीरी ह. भ . प. सौ. संध्याजी संतोष पाठक पोतदार (हरीपुर सांगली?)यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम मोपा येथील सातेरी माउली पंचायतन देवस्थानच्या सभाग्रुहात मंगळवार दि.8 नोव्हेंबर रोजी रात्रौ. 10 वाजता आयोजित केला आहे .
सौ. संध्याजी पाठक पोतदार या महाराष्ट्रातील महीला कीर्नकार असू त्यानी महाराष्टा सोबत गोवा मध्यप्रदेशात त्यांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. सामाजिक प्रबोधना बरोबरच त्यांच्या कीर्तनात अभिजात संगीताचे संर्वांग सुंदर व
सौ. संध्याजी पाठक पोतदार या उच्च शिक्षा विभुषीत असुन.अनेक शाळा महाविद्यालये ,मधून त्यांनी कीर्तना सोबतच व्याख्याने केली आहेत .त्या शिवाय त्यांनी अनेक ठीकाणी आध्यत्मकि विषयावर प्रवचन , निरुपण केले आहेत. तसेच त्या लेखीका पण आहेत. आध्यात्मा विषयी त्यानी अनेक विषयावर लेखन व कथा लेखन ही केले आहे. शिवपुराणाच्या गाढे अभ्यासक असलेल्या सौ.संध्याजी पाठक पोतदार यांचा श्रीमद भागवत, श्रीमतद देवी भागवत रामायण, य़ा विषयावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे.
त्यानी कीर्तन लेखन याविषया वर उल्लेखनीय कार्य केल्याने त्याना महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत .स्वामी अमलानंद पुरस्कार, कीर्तन भुषण युवा पुरस्कार, कीर्तन मंजीरी पुरस्कार,संत नरहरी सोनार पुरस्कार असे कित्येक पुरस्कारांनी त्यांना सन्मातीत केले आहे
मोपा गावातील श्री देवी सातेरी माऊली मंदिर सभागृहात होणाऱया या विषेश कीर्तनात त्यांना हार्मोनियम साथ सुप्रसिद्ध गोमंतकीय संगीतकार दिगंबर (बाळू) गाड हे करतील. तबलासाथ गोवा संगीत महाविद्यालयाचे तबल्याचे प्राध्यापक अमर मोपकर हे करतील.









