ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात मागील तीन आठवड्यापासून पेट्रोल डिझेल च्या किंमती सातत्याने वाढ होत आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मागील दोन दिवसांपासून केंद्र सरकारवर ट्विट द्वारे निशाणा साधत आहे. शनिवारी देखील आव्हाड यांनी ट्विटर वर एक फोटो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये पेट्रोलपंपाजवळ एक फ्लेक्स लागलेलं दिसून येतं आहे. त्या फ्लेक्सवर नरेंद्र मोदींचा फोटो असून त्यावर अक्कड बक्कड बंबे बो…. 80, 90 पूरे 100… असं लिहिलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी वेगळ्या प्रकारे इंधन दरवाढीचा निषेध केला आहे.

घर बसल्या पैसे कमवा….. संध्याकाळनंतर पेट्रोल डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका… आत्मनिर्भर व्हा, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी गुरूवारी आव्हाडांनी अक्षय कुमारचं जुनं ट्विट शोधून काढत इंधन टरवाढीवरून त्याला टोमणा मारला होता तर शुक्रवारी म्हणजे काल महानायक अमिताभ बच्चन यांना आव्हाडांनी चिमटा काढला होता.
दरम्यान, आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याने नवीन दराप्रमाणे मुंबईत प्रती एक लिटर पेट्रोलसाठी 86.91 रुपये तर डिझेलसाठी 78.57 रुपये मोजावे लागणार आहेत.









