सिडनी
खाण्यात फॅटचे प्रमाण अधिक असेल तर संध्याकाळी व्यायाम करण्याची मात्रा लागू पडत असल्याचे एका संशोधनात दिसून आले आहे. चयापचय क्रिया सुधारून रक्तशर्करा नियंत्रणात राहते, असेही त्यात समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील कॅथलिक युनिव्हर्सिटीच्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे. नेहमी सांगितले जाते की सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यास फायदेशीर असतं. पण संध्याकाळी व्यायाम करण्याचे खूप सारे फायदे होतात. चयापचय क्रिया सुधारते व रात्री रक्तशर्करेची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यांना टाइप टूचा डायबेटीज (मधुमेह) होण्याचा धोका आहे अशांना वरील उपाय उपयुक्त ठरू शकतो. कॅथलिक युनिव्हर्सिटीने आपल्या अध्ययनात टाइप-2 डायबिटीज होण्याची शक्यता असणाऱया पुरुषांना समाविष्ट केले होते. यांचे वजन तर जास्त होतेच पण पुरेसे सक्रीय नसलेल्या अभ्यास करण्यात आला. सकाळ-संध्याकाळ व्यायाम केलेल्यांच्या हृदयाच्या स्थितीत सुधारणा राहिल्या तर संध्याकाळी व्यायाम करणाऱयांची साखर पातळी नियंत्रणात राहिली. व्यायाम न करणाऱयांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली.









