नवी दिल्ली
भारतीय क्रीडा प्राधिकरणचे (साई) सरसंचालक संदीप मुकुंद प्रधान यांना आणखी दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या 6 जूनपासून त्यांना ही दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. प्रधान यांचा कार्यकाल वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मांडला होता. त्याला नंतर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ‘मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यांना 6 जूनपासून दोन वर्षांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे,’ असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले. ऑगस्ट 2017 मध्ये त्यांची डीजी पदावर नियुक्ती करण्यात आली होती.









