126 वर्षांत प्रथमच बाटाची धुरा भारतीयाच्या हाती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
126 वर्षांच्या बाटा कंपनीच्या इतिहासात प्रथमच एका भारतीयाच्या हाती नेतृत्त्व जाणार आहे. वय वर्ष 49 असणारे संदीप कटारीया यांची पादत्राणांच्या व्यवसायात आघाडीवर असणाऱया ‘बाटा’ कंपनीच्या जागतिक स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीईओ एलेक्सिस नॅसार्ड निवृत्त होत असल्याने यापदी कटारीया यांची सीईओ म्हणून निवड करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.
स्विर्त्झलँड येथे मुख्यालय असणाऱया फुटवेअर कंपनी बाटा यांची भारतामध्येही मोठी बाजारपेठ आहे. प्रारंभीच्या काळात बाटा इंडियाने 10 टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ प्राप्त केली आहे. यामध्ये त्यांनी नफा कमाईत दुप्पटचा वाटा प्राप्त केला आहे. बाटा इंडियाने 2019-20 मध्ये 3,053 कोटी रुपयांच्या महसूलावर 327 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमाई केल्याची नोंद आहे.
1984 मध्ये टॉमस बाटा यांनी स्थापन केलेल्या बाटाच्या अक्सर फुटवेअर उद्योगाला हेनरी फोर्ड या नावांनी ओळखले जात होते. चप्पल व्यवसायातील बाटा ही जगातील दिग्गज कंपनी आहे. कंपनी 5,800 दुकानांच्या आधारे वर्षभरात 18 कोटीपेक्षा अधिक चप्पल विक्री करत असल्याची नोंद आहे.
जगातील कार्पोरेट क्षेत्रावर भारतीयांची छाप
कंपनी………….. सीईओ
मायक्रोसॉफ्ट….. सत्या नडेला
गुगल…………… सुंदर पिचाई
मास्टरकार्ड……. अजय बग्गा
आयबीएम…….. अरविंद कृष्णा
रेकिट बेन्किजर.. के लक्ष्मण नरसिम्हन
डियाजिओ…….. इवान मॅथ्यूज
नोवार्टिस………. वसंत नरसिम्हन
बाटा संदीप कटारीया









