बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन-निरुपण
वार्ताहर / किणये
हुंचेनहट्टी क्रॉस, मच्छे येथे संत निवृत्तीनाथ वारकरी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवारी पीपल ट्री, जांबोटी रोड, पिरनवाडी येथे थाटात झाला. नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळय़ानिमित्त हभप बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा संख्येने हजर होते.
बेळगाव तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संत निवृत्तीनाथ सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेने अल्पावधीतच वारकरी सांप्रदायासाठी विविध उपक्रम राबवून समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्थेची नूतन वास्तू पिरनवाडी येथे झाली असल्यामुळे वारकरी तसेच या संस्थेतील सभासदांना सोयीचे ठरणार आहे.
हभप बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. हभप पूर्णानंद काजवे महाराज यांच्या हस्ते काऊंटरचे उद्घाटन व हभप भैरू डुकरे यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. चेअरमन नागेंद्र भारती यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. नावगे क्रॉस येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बंडातात्या कराडकर यांचा कीर्तन-निरुपणाचा कार्यक्रम झाला. संसार करत परमार्थ कसा करावा? याबद्दल बंडातात्या कराडकर यांनी मार्गदर्शन केले. विठ्ठलाचे नामस्मरण करा, असेही सांगितले. या कीर्तनाला परिसरातील वारकरी उपस्थित होते. व्हाईस चेअरमन काशिनाथ गुरव, संचालक आप्पाजी बोकडे, बाबुराव मोटणकर, तातोबा दळवी, उदय देसाई, किरण पाटील, भैरू डुकरे, विष्णू दळवी, धोंडिबा बोंजुर्डेकर, रामलिंग पाटील, इंदुबाई धामणेकर, यशोदा आपटेकर, काळू पावशे, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. वडगाव शाखेचे अध्यक्ष राजू कदम, उपाध्यक्ष रमेश कडगावकर, मनोहर पाटुकले, सिदाय मादाक्काचे, परशराम कुरंगी, नारायण मोरे, एकनाथ कंग्राळकर, अनंत कणबरकर, फकिरा कुंडेकर, वैजनाथ उच्चुकर, नर्मदा बोंगाळे आदींसह कर्मचारी वर्ग, पिग्मी कलेक्टर व सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









