पेडणे (प्रतिनिधी)
कोकणचे पंढरपुर म्हणुन प्रसिद्ध असलेले व गोव्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पिंगुळी येथील संत राउळ महाराज मठाचे विद्यमान मठाधीपती परमपुज्य विनायकअण्णा राऊळ महाराज यांच्या जन्मदिना निमित्त आज आटोपशीर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वभुमीवरील शासकीय नियम पाळून हा सोहळा संपन्न होणार,आहे.
आज 13 मार्च रोजी काही मोजक्मयाच भक्तांच्या उपस्थीतीत पहाटे पाच वाजता काकाड आरतीने कार्यक्रमाची सुरवात होइल. सकाळी सहा वाजता परमपुज्य संदगुरु संत राउ? महाराज यांच्या समाधीवर अभीषेक व इतर धार्मीक वीधीना प्रारंभ होईल. नंतर सकाळच्या आरत्या व तीर्थ प्रसाद होईल ठीक 10वाजता या मठाचे विद्यमान मठाधिपती सदगुरू संत अण्णा महाराज यांचे आगमन व पाद्यपुजा होईल. त्या नंतर सदगुरु अण्णा महाराज आणी सौ.बाईमा? यांच्या विवाहसोहळय़ाच्या सुवर्ण महोत्सवा निमीत्त त्यांची पुजा व औक्षण करण्यात येईल येईल. त्या शिवाय आज गौरी शंकर मंदिराचाही 26 वा वर्धापनदिन असल्याने त्या मंदिरातही सकाळ पासुन धार्मीक विधी व वरदशंकर पुजा होईल. . .
सकाळी 10 वाजता.ख्यातनाम गायीका कवीता देशपांडे यांचे गायन होईल नंतर संतोश जोशी यांनी संपादित केलेल्या गुरूतत्व या मासिकाचे प्रकाशन होईल. या सोहळय़ाचे औचीत्य साधुन गरजवंत रुग्णांना रुग्ण?पयोगी वस्तू औषधे व इतर साहीत्य व प्रुत्रीम जयपुर फुट चे वीतरण परम पुज्य विनायक अण्णा राउळ महाराज चँरिटेबल ट्रष्ट च्या वतीने विवीध संस्था?च्या प्रतीनीधींकडे वितरीत केले जाईल.
दुपारी ठिक. 12.30 वाजता महाआरती होईल.त्या नंतर दुपारी 1ते3 वाजे पर्यंत महाप्रसाद होईल वास्तवीक आजवर या मठात दरवषी दुपारी 11 वाजल्या पासुन अखंड महाप्रसाद रात्री 1 वाजेपर्यंत चालू असायचा परंतु यावषी कोरोना मुळे हा कार्यक्रम आटोपशीर असल्याने तीन वाजेपर्यंतच महाप्रसाद व्यवस्था असेल. दुपारी 3 वाजल्या पासुन विवीध भक्तीमय कार्यक्रम होतील त्यात गीत राऊळायण,या विषेश कार्यक्रमा सोबत लेझीम नृत्य , भजने असे कार्यक्रम असतील. ठीक 7 .वाजता राऊळबाबांची सांज आरती रात्री 8 वाजता गोव्यातील प्रसिद्ध तबला वादक आदित्य सामंत यांचा एकेरी तबला वादनाचा कार्यक्रम होईल. 10.30 वाजता शेजारती होईल व त्या नंतर श्रद्धा खामकर प्रस्तुत अनाथांचा नाथ राऊळनाथ हा नृत्य व संगीत गायनाचा कार्यक्रम होईल . सोहळय़ास उपस्थीत रहाणाऱया सर्व भक्तानी कोरोना बाबतचे सर्व नियम पाळुन सामाजीक अंतर राखुन दर्शन घ्यावे व कोरोना बाबतचे सर्व नियम पाळुन सहकार्य करावे असे आवाहन परम पुज्य सदगुरु समर्थ संत राउळ महाराज ट्रस्टचे विश्वस्त अनिल खवटे व प्रदिप घाडी आमोणकर यानी केले आहे.









