पणजी/ प्रतिनिधी
उगार शुगर मिल्सचे प्रवर्तक राजाभाऊ शिरगांवकर यांची आज भेट घेऊन ऊस उत्पादन व संजीवनी साखर कारखाना चालू करण्यासंबंधी दीर्घ चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन व सूचना केल्या. यावेळी सरकार नियुक्त समितीचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर, ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र देसाई, श्री. वासुदेव गांवकर, सुभाष फळदेसाई, माजी कृषी संचालक श्री. सतीश तेंडुलकर व उगार शुगर चे अधिकारी उपस्थित होते.









