ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, ही भेट राजकीय कारणांसाठी नव्हती.
राऊत यांच्या मुलीचे 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत सपत्नीक राज यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी दोन्ही कुटुंबात अर्धा तास मनमोकळ्या गप्पा झाल्या. लग्नपत्रिका दिल्यानंतर राऊत घराबाहेर पडताना राज आणि शर्मिला ठाकरे हे त्यांना आपुलकीने गाडीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.









