मुंबई / ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवण्याचे पुनरूच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेस प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा गोंधळ निर्माण झालेला आहे. बऱ्याचदा ते अशी आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येत असतात. त्यामुळे त्यांनी केलेले विधान हे हास्यास्पद असल्याचे हुसेन दलवाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
हुसेन दलवाई म्हणाले की, संजय राऊत यांचे हे विधान हास्यास्पद आहे. अशी विधानं करण्याची त्यांना सवय झाली आहे. काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. त्यांच्या विधानाला फार महत्त्व देण्याची गरज नाही. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. असं असताना युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार कुणी दिला ? स्वत: शरद पवारही असं म्हणणार नाही. काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष आहे. असं असताना त्याचं नेतृत्व इतर पक्षाचं कुणी कसं करणार? एनसीपी ही काही ऑल इंडिया पार्टी नाही. एनसीपी राज्यातल्या विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून युपीएचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं समजणं चुकीचं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये इतकाच आमचा सल्ला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








