प्रतिनिधी / कोल्हापूर
केएमटीमध्ये अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक असणाऱया संजय भोसले यांची केएमटीकडून महापालिकेत यांची झालेली नियुक्ती नियमबाहय़, बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने काढला असून त्या संदर्भातील अहवाल प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांना सादर केला आहे. या समितीत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, तत्कालिन कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड आणि सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांचा समावेश आहे.
संजय भोसले यांच्या पदोन्नतीबद्दल महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत रामाणे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच ज्येष्ठ नगरसेवक भुपाल शेटे यांनीही या संदर्भात चौकशीची मागणी केली होती. रामाणे यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भोसले यांच्याबद्दल असणाऱया तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून अहवाल देण्यास सांगितले. त्यानुसार या समितीने अहवाल सादर केला असून त्यामध्ये भोसले यांची महापलिकेतील नियुक्ती नियमबाहय़ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
भोसलेंवर कारवाई शक्य
त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर भोसले यांच्यावर निलंबनासारखी कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी महापालिकेतील नियुक्तीनंतर ज्या पदावर काम केले आहे, त्याचा पगार आणि कार, त्यावरील खर्च या संदर्भातही वसुली करण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
Previous Articleपाचशे कोटी द्या, अन्यथा डाटा नष्ट करू
Next Article जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये अभिज्ञाला रौप्य पदक









