सांगली / प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील 149 प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांनी दिली. बैठकीत 220 प्रस्तावावर चर्चा झाली, 149 प्रस्ताव मंजूर तर 71 प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. दरवर्षी शासनाकडून अपात्र शोध मोहीम घेतली जाते. मोहिमेत 102 अपात्र लाभार्थ्यी आढळुन आल्याने ते निकाली काढण्यात आले आहे तसेच समिती स्थापन होऊन 16 महिने झाले. आजअखेर 892 प्रस्ताव दाखल झाले यापैकी 188 प्रस्ताव अपात्र असल्याने निकाली काढण्यात आले. आत्तापर्यंत 691 प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बैठकीला आशा पाटील, अनिता निकम, बिपीन कदम ,आप्पासाहेब ढोले, संतोष भोसले, नितीन काळे , तहसीलदार के व्ही घाडगे, तलाठी एम. आय. मुलाणी, एस. आय. खतिब, सचिन गुरव आणि प्रियांका तुपलोंडे उपस्थित होते.









