वार्ताहर / देवगड:
देवगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष मिलिंद साटम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत 58 लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
या सभेला देवगड- जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, पं. स. चे माजी सभापती संजय देवरुखकर, समिती सदस्य प्रकाश गुरव, दीपक कदम, विश्वनाथ परब, सजाऊद्दीन सोलकर आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेच्या 225 प्रकरणांना आतापर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्याच्यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे साटम यांनी सांगितले. या योजनेसंदर्भात काही अडचणी असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन त्यांनी केले.









