चोरट्यांनी घराच्या वरच्या मजल्याच्या खोलीमधून प्रवेश केला
प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील संजयनगर येथे 46 हजार 400 रूपयांची चोरी झाली. सुरेश केशव नागावकर वय 56, रा. ताराई पार्क यांच्या घराच्या वरच्या मजल्याच्या खोलीमधून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील 26 हजार 400 रूपये रोख रक्कमेसह 46 हजार 400 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत नागावकर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नागावकर यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा चुकून उघडा राहिला होता. या खोलीमधून चोरटे आतमध्ये शिरले. त्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरातील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 46 हजार 400 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीसांच्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.








