बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड चित्रपट इंडस्ट्रीमध्ये मादक पदार्थांची होणारी तस्करी आणि सेवन याप्रकरणी दोन अभिनेत्रींनसह त्यांचे सहकारीह सीसीबीच्या कारवाईत अटकेत आहेत. एनडीपीएसच्या विशेष कोर्टाने कन्नड अभिनेत्री संजना गलराणी आणि रागिणी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २४ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. या दोघीही परप्पन मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत.
या दोघींना जामिनावर सोडल्यास पुराव्यंमध्ये बदल करून केसची दिशा बदलू शकतात, असे सांगून सरकारी वकिलांनी दोन्ही अभिनेत्रींना जामीन देण्यास तीव्र विरोध दर्शविला. या प्रकरणातील तपास अपूर्ण असल्याने दोघांनाही जामीन मिळू नये अशी मागणी केली. दरम्यान कोर्टाने सुनावणी २४ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.









