बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड चित्रपट सृष्टीत होणाऱ्या ड्रगच्या तस्करी वरून अभिनेत्री संजना संजना गलराणी अटकेत आहे. दरम्यान कर्नाटक हायकोर्टाच्या सूचनेनंतर केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या एक पथक आज परप्पन अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात भेट देणार असून अटक अभिनेत्री संजना गलराणीच्या प्रकृतीच्या स्थितीबद्दल तुरूंग अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी महिला पोलीस कर्मचारी सोबत जाणार आहेत.
उच्च न्यायालयात संजनाने दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. हे प्रकरण ४ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. कन्नड चित्रपटाच्या अभिनेत्यांसह सप्टेंबरमध्ये ड्रग पेडलिंग प्रकरणी संजानाला बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली होती.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात कन्नड चित्रपटसृष्टीत गायक आणि कलाकारांना ड्रग्स पुरवठा करणाऱ्या तीन जणांना अटक केल्याने सीसीबीने बेंगळूरमधील मादक द्रव्यांच्या चौकशीचा तपास गतिमान करत या प्रकरणी १३ हुन अधिक जणांवर कारवाई केली आहे.