प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाला सुद्धा आयुक्त, श्रमिक संघ या न्यासाची मान्यता देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राजाराम वरुटे, केशवराव जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पुन्हा एकदा शिक्षक संघ हा शिवाजीराव पाटील यांचाच यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटास ही आयुक्त, श्रमिक संघ या न्यासाची नोंदणी मिळाली असून यापुढेही माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे कार्य यापुढेही अखंडपणे चालू ठेवण्याचा निर्धार माधवराव पाटील, राजाराम वरुटे, केशवराव जाधव, बाळासो काळे, दि. रा .भालतडक, वसंतराव हारुगडे, मधुकर काठोळे, धैर्यशील पाटील, लायक पटेल, तुकाराम कदम, विजय बहाकर, स्मिता सोहनी यांनी व्यक्त केला. राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या 2018 च्या आदेशान्वये शिक्षक संघटनानीही मा. आयुक्त, श्रमिक संघ या न्यासाची नोंदणी करणे बंधनकारक केल्याने बहुतेक संघटनानी नोंदणी केली. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाने ही प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार श्रमिक संघ कार्यालयाने नोंदणी करुन मान्यता दिली आहे.त्यामूळे शिक्षक संघ हा शिवाजीराव पाटील यांचाच आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.








