जगावर महायुद्धाचेही ढग, युपेन-रशिया चर्चा विफल, रशियाचा अण्वस्त्रदलाला सज्जतेचा आदेश,
27 देशांसाठी रशियाकडून वायूक्षेत्र बंद
@ कीव्ह / वृत्तसंस्था
रशिया-युक्रेनमधील संघर्ष जागतिक महायुद्धाच्या दिशेने सरकू लागला काहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रशियाने संघर्ष थांबविण्यासाठी 3 अटी घातल्या आहेत. दुसरीकडे रशियाने आपल्या अण्वस्त्रदलाला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. नाटो सदस्य देशांकडून रशियाविरोधात बेताल वक्तव्ये केली जात असल्याने अण्वस्त्रदलाला सज्जतेची सूचना दिल्याचे वक्तव्य रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी केले. अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर रशिया सोडण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अमेरिका आता रशियावरच हल्ला करणार का, हा प्रश्न चर्चिला जात आहे. सोमवारी युक्रेन आणि रशिया यांच्यात बेलारुसमध्ये झालेली चर्चा विफल झाल्याने युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाच्या अटी मान्य न झाल्यास स्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी सोमवारी फोनवरुन चर्चा केली. त्यावेळी पुतिन यांनी संघर्ष थांबू शकतो असे संकेत दिले. मात्र, त्यासाठी त्यांनी 3 अटी घातल्या. क्रिमियावरील रशियाचे सार्वभौमत्व मान्य करावे, युपेनचे निःसैनिकीकरण (डीमिलिटराझेशन) करावे आणि युक्रेन हा निष्पक्ष (न्यूट्रल) देश म्हणून घोषित केला जावा, अशा मागण्या त्यांनी केल्या. या मागण्यांवर मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया त्वरित समजू शकली नाही.
युपेन-रशिया चर्चा निष्फळ
बेलारुसच्या सीमारेषेवर रशिया आणि युपेन यांच्यात सोमवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी चार वाजता बोलणी सुरु झाली. संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत चाललेल्या या चर्चेत बऱयाच बाबींवर खल करण्यात आला. युक्रेनमधून सर्व रशियन सैन्य काढून घेण्यात यावे, अशी मागणी युक्रेनने केल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर रशियाची प्रक्रिया त्वरित समजू शकली नाही. मात्र, चर्चा विफल झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर रशियाने युद्धाला सज्ज रहा अशा आदेश दिला आहे, अशी माहिती तेथील प्रसार माध्यमांनी दिल्याने महायुद्धाच्या चर्चेला प्रारंभ झाला. दुसरीकडे चीननेही रशियाचे समर्थन केल्याने या शक्यतेत भरच पडली आहे.
पाचव्या दिवशी मोठी होनी
सोमवार हा युद्धाचा पाचवा दिवस होता. तथापि, अद्याप तोडगा निघालेला नाही. तसेच कोणत्याही एका बाजूचे पूर्ण वर्चस्व दिसून येत नाही. प्रारंभीचे दोन दिवस रशियाची सरशी झाल्याचे दिसत होते. तथापि, नंतर युक्रेननेही जोरदार प्रतिकार करत रशियाला रोखल्याचे दिसून येत होते. दोन्ही बाजूंनी परस्परांची मोठी हानी केल्याचे दावे केले आहेत. रशियाची 40 विमाने पाडल्याचा दावा करण्यात आला.
नाटोच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न
दुसरीकडे युक्रेनने नाटोच्या सदस्यत्वाकरीता आवेदनपत्र सादर केले आहे. लवकरात लवकर हे सदस्यत्व मिळावे, अशी मागणी या देशाने केली आहे. नाटोची सदस्यता मिळाल्यास या देशाला नाटो संघटनेचे सैनिकी संरक्षण मिळू शकते. त्यामुळे या देशाची संग्राम करण्याची क्षमता वाढू शकते. त्यामुळे सदस्यत्वासाठी हा देश कसोशीने प्रयत्न करीत आहे. अमेरिकेने पुढाकार घेतल्यास हे सदस्यत्व कमीत कमी वेळात मिळू शकते, असे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचे मत आहे.
आता बेलारुसचा प्रश्न
रशियाने युपेनवर हल्ला केल्यामुळे युरोपात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच, दुसरीकडे पूर्वी रशियाचाच भाग असणारा बेलारुस हा देश पुन्हा रशियाबरोबर संधान बांधण्यास तयार झाल्याचे वृत्त आहे. हा देश लवकरच रशियात विलीन होऊ शकतो, असेही अनेकांचे म्हणणे आहे. बेलारुसने रशियात विलीन होण्याचे ठरविल्यास त्याचा पश्चिम युरोपशी संबंध तुटू शकतो. परिणामी नव्या समस्या निर्माण होऊ शकतात असा एक विचारप्रवाह आहे.
चीनकडून रशियाचे समर्थन
चीनने पुन्हा रशियाचे समर्थन केले आहे. रशियावर आर्थिक निर्बंध लादल्याने परिस्थिती आणखी चिघळेल अशी शक्यता या देशाने व्यक्त केली. तसेच अशा निर्बंधांना विरोध दर्शविला. परिणामी, चीन आणि रशिया एका बाजूला झाल्याचे चित्र दिसत आहे. रशियाच्या माध्यमांनी चीनच्या पाठिंब्याची माहिती दिली. चीन रशियाशी व्यापारही सुरु ठेवेल अशी माहिती देण्यात आली आहे.
युपेनची मोठी हानी
सोमवारीही युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याने मोठी हानी केल्याचे सांगण्यात आले. रशियन सैनिक लहान मुलांनाही मारत आहेत. तसेच लूटमार मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. युक्रेनच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा होत आहे. रशियाच्या हल्ल्यात सोमवारी 14 बालकांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक जखमी झाले, असा दावा युपेनकडून करण्यात आला आहे.
रशियाची अण्वस्त्र सज्जता
युक्रेन प्रश्नी रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे गंभीर परिणाम, जगाला भोगावे लागणार आहेत. रशियाने वेळप्रसंग पडला तर अणुयुद्ध करु असा पवित्रा घेतला आहे. रशियाच्या उत्तर आणि पूर्व भागांमध्ये अणुअभ्यास सुरु करण्यात आला आहे अशी माहिती रशियाचे विदेश व्यवहार मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांनी दिली. अध्यक्ष पुतीन यांना य युद्धाभ्यासाची सूचना देण्यात आली आहे.
मॉस्को सोडण्याचा आदेश
अमेरिकेने आपल्या नागरिकांना मॉस्को सोडण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अमेरिका आता स्वतः युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. अमेरिकेने बेलारुस येथील स्वतःचा दुतावासही बंद केला आहे. अमेरिकेच्या या हालचाली वरकरणी सावध वाटत असल्या तरी कदाचित त्यामागे वेगळी योजना असू शकते, असे मत व्यक्त होत आहे. अमेरिकेला नाटो सदस्य देशांचा पाठिंबा मिळाल्यास या युद्धात अमेरिका स्वतः उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्याही प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याचे सांगण्यात येते.
नागरिक परत आणण्यावर भर
भारताने अद्याप तरी या संघर्षात कोणाचीही बाजू घेण्याचे टाळले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या विरोधातल्या प्रस्तावावर मतदानाच्या वेळी भारत अलिप्त राहिला होता. रशियाने भारताच्या अलिप्ततेचे स्वागत केले. तर अमेरिकने रशियाचे मन वळविण्याची सूचना भारताला केली. अमेरिकेने पाकिस्तानलाही त्याची भूमिका स्पष्ट करण्याची समज दिली आहे. सध्या भारत युक्रेनमधून आपले नागरिक बाहेर काढण्यावर भर देत आहे. युक्रेन ते पोलंड अशी रेल्वे आता सुरु झाल्याने भारतीय विद्यार्थी आणि नागरिक मोठय़ा संख्येने युक्रेनबाहेर पडू शकत आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने विमानांच्या फेऱया सुरु केल्या आहेत. आतापर्यंत 1 हजारांहून अधिक नागरिक भारतात परत आणण्यात आले असून लवकरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
बेलारुसमध्ये रशियाची अण्वस्त्रे
बेलारुस या देशात रशियाची अण्वस्त्रे असल्याने सध्याच्या परिस्थितीत या देशाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. ही अण्वस्त्रे अद्यापही रशियाच्याच नियंत्रणात आहेत. बेलारुसमध्ये रशियन नागरिकांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बेलारुस वेगळा देश असला तरी तो रशियाच्या धोरणानुसार जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे ही अण्वस्त्रे हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. नाटो देश याच संबंधात चर्चा करीत आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. सध्या रशियाकडे अमेरिकेपेक्षाही जास्त संख्येने आणि जास्त संहारक अण्वस्त्रे आहेत असे बोलले जाते. मात्र, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याकडे एकत्रितरित्या रशियापेक्षा जास्त अण्वस्त्रे असल्याचेही जागतिक तज्ञांचे मत आहे.
बायडन यांचे महत्वाचे वक्तव्य
रशियाने आपली महत्वाकांक्षा आवरली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. शांतता की युद्ध हा निर्णय आता रशियाच्या हाती आहे. कोणत्याही परिस्थितीत जग शांततेच्या बाजूने असेल. मात्र, परिस्थिती तशीच निर्माण झाल्यास काहीही घडू शकते, हे सर्वांनी लक्षात घ्यावयास हवे, असे महत्वाचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी केले आहे. एकंदर स्थिती आता स्पष्ट होत आहे.
बॉक्स
जग चिंतातूर…
ड संघर्ष पाहता पाहता चिघळल्याने जगात सर्वत्र चिंतेची भावना
ड कोरोना संकटातून पूर्ण बाहेर पडलेले नसतानाच युद्धाचे सावट
ड महासत्तांचा एक निर्णयही महायुद्धाला होऊ शकतो कारणीभूत









