सावंतवाडी/ प्रतिनिधी-
गणरायाच्या आगमनाला अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. यंदा गणरायाचे जंगी स्वागत करायला मिळणार, घराघरात आरती, भजने करायला मिळणार या अपेक्षित यंदा गणेश भक्त आहेत. परंतु कोरोना लाटेची भीती अजूनही मनात आहे. गतवर्षी कोरोनाच्या पहिली लाटेत गणेश चतुर्थीवर संकट होते. त्यामुळे गावा गावातील भजनी मंडळांवर संक्रांत ही आली होती. मात्र यंदा गणेश चतुर्थी उत्सवावर गतवर्षी चे सावट नाही त्यामुळे वाड्या वाड्यात घराघरात यंदा भजनी मेळ रंगणार आहेत. त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून भजनी मेळा यांचे संगीत साथ तबला-पेटीच्या दुरुस्तीत कारागीर दंग झाले आहेत.
कोरोना महामारी चे संकट अद्यापही कायम असल्याने अनेक उद्योग व्यवसायावर संक्रांत कायम आहे. भजनी साहित्य कारागिरांवर पूर्णपणे संक्रांत आली होती कारण गतवर्षी शासनाने घरोघरी भजने करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे घराघरातच आरती भक्तगण करत होते. मात्र यंदा स्थितीत थोडीफार निवळली आहे. त्यात निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. मात्र गणेश चतुर्थी उत्सवात भजनी मेळ रंगणार की नाही याबाबत अद्यापही शासनाचे धोरण नाही.
तरी पण सर्व भजन मंडळाने आपले भजनाचे साहित्य दुरुस्तीसाठी दिले आहेत. आता गावागावात पंचक्रोशी वार साहित्य दुरुस्ती करणारे कारागीर पाहायला मिळत आहेत. मात्र वाढत्या महागाईमुळे तबला पुडा व काकर दुपटीने वाढला आहे. पूर्वी तबला शाई घालण्यासाठी अवघे शंभर ते दीडशे रुपये लागायचे,आता ते पाचशे ते सहाशे रुपये झाले आहेत तर अन्य खर्च दुप्पट झाला आहे.









