प्रतिनिधी/ बेळगाव
जवळजवळ दहा महिन्यांच्या कालावधीनंतर संगीत कलाकार संघाचा कार्यक्रम शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकुर सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता. संघाचे सेपेटरी प्रभाकर शहापूरकर यांनी कलाकारांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे स्वागत केले. सरस्वती वाचनालयाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला यादवेंद्र पुजारी यांच्या स्वतंत्र हार्मोनियम वादनाने सुरुवात झाली. त्यांनी अहिर भैरव या रागात विलंबित आणि धृत बंदिशी सादर करून एक नाटय़पद वाजविले.
मध्यंतरानंतर डॉ. स्नेहा राजुरीकर यांनी राग गौड सारंग आणि धानी प्रस्तुत केला. त्यांना तानपुऱयावर सुहासिनी देशपांडे, संवादिनीवर योगेश रामदास आणि तबल्यावर राजेंद्र भागवत यांनी संगत केली. संघाचे अध्यक्ष नंदन हेर्लेकर आणि वरि÷ कलाकार राजप्रभू धोत्रे यांनी कलाकारांचा पुष्प देऊन सन्मान केला. संघाचे उपाध्यक्ष मुकुंद गोरे यांनी कलाकार आणि श्रोत्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला कलाकार, विद्यार्थी आणि रसिक यांची उपस्थिती लक्षणीय होती. संगीत कार्यक्रमानंतर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यात नव्या कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली.









