प्रतिनिधी/ बेळगाव
संगीत कलाकार संघाच्या फेब्रुवारी महिन्याची बैठक मंगळवार दि. 28 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात हार्मोनियम वादक निरंजन मूर्ती, कोटूर यांचे वादन होणार आहे. संगीतप्रेमी घराण्यात जन्मलेले निरंजन यांनी नीलकंठ एच. एम., हनुमंताप्पा होळेअलूर आणि पं. वसंत कनकापूर यांच्याकडून वादनाचे शिक्षण घेतले. स्वतंत्र वादन आणि साथसंगत या दोन्हींमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्याबरोबर जितेंद्र साबण्णावर यांची तबला साथ असणार आहे.

दुसऱ्या सत्रात पुण्याचे युवा तबला वादक प्रथमेश अमऊळे यांचे स्वतंत्र वादन होणार आहे. यांचे प्रथम गुऊ समीर सूर्यवंशी आहेत. सध्या ते प्रख्यात वादक आणि गुऊ पंडित रामदास पळसुले यांच्याकडून मार्गदर्शन घेत असून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडूनही शिक्षण घेत आहेत. प्रथमेश हे संगीत विशारद उत्तीर्ण असून पुण्याच्या ललित केंद्रातून ते एमए करत आहेत. त्यांना सीसीआरटी आणि गांधर्व महाविद्यालयाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. प्रथमेश यांच्याबरोबर योगेश रामदास हे लेहरा संगत करणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, अशी विनंती संघातर्फे करण्यात येत आहे. कार्यक्रम सर्वांना विनामूल्य खुला आहे.









