ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या आईचे, बल्किश मलिक यांचे रविवारी, 25 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या.
संगीतकार अमाल आणि अरमान मलिक यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आजीच्या निधनासंबंधी पोस्ट केली. त्यासोबत त्यांनी आजीसोबतचे फोटोही शेअर केले. अनु मलिक यांच्या आईला स्ट्रोक आल्यानंतर गुरुवारी जुहू येथील एका खासगी इस्पितळात त्यांना उपचारांसाठी दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी सकाळी सांताक्रुझ येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

म्यूझिक कंपोजर्स अमाल आणि अरमान मलिक यांनी आजीच्या निधनानंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे दु:ख व्यक्त केले आहे. ‘मला तुला भेटायचे होते.पण तू आम्हाला सोडून गेलीस. मी आकाशाकडे पाहिले आणि तू तिकडेच आहेस असे मला जाणवले’ या आशयाची पोस्ट अमालने लिहिली आहे.









