वार्ताहर/ हुक्केरी
हिडकल डॅम येथील श्री संगम सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 23 रोजी अर्ज माघार घेण्याचा दिवस असल्यानी 14 जागा साडून उर्वरीत सदस्यांनी माघार घेतल्यानी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजेंद्र पाटील, शंकरराव भांदुर्गे, शशिकांत नाईक, बसगौडा पाटील, गुरुसिद्धाप्पा पाटील, अण्णासाहेब पर्वतराव, अर्जुननायक पाटील, श्रीमंत सन्नाईक, शिवाप्पा घस्ती, संगीता करगुप्पी, राजश्री कवटगीमठ यांची निवड करण्यात आली आहे. आमदार उमेश कत्ती व बीडीसीसी बँक अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या प्रयत्नानी ही निवड बिनविरोध झाली आहे.









