प्रतिनिधी/ संगमेश्वर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज लॉक डाऊनचा आठवा दिवस असून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहने आणि नागरिकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. लॉक डाऊन असतानाही संगमेश्वरात खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामध्ये सोशल डिस्टन्सिगचे कोणतेही नियम पाळण्यात येत नव्हते. यामुळे सोशल डिस्टन्सिगची ऐशीतैशी पहायला मिळाली.
आज, बुधवार हा संगमेश्वरमध्ये आठवडा बाजार असतो. मात्र कोरोनामुळे दोन आठवडे बाजार रद्द करण्यात आला होता. मात्र आज तिसऱ्या आठवड्याची दिवसी अचानक खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी गाड्याची संख्या जास्त होती. यामुळे या दुचाकी आणि चारचाकी वाहतुकीवर कडक निर्बंध लादावेत अशी मागणी होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









