संगमेश्वर /प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. रियाना दिलावर मुकादम असे 45 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. घटना आज संध्याकाळी घडली अशी माहिती देवरुख ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली.
देवरुख नजीकच्या तुळसणी गावातील रियाना या घरातील कचरा टाकण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी विजेचा गडगडाट होवून त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत असल्याचे सांगितले.
साखरपा जवळील मेघी गावात वीज पडून 7 जण जखमी
रत्नागिरी तालुक्यातील साखरपा जवळील मेघी गावात वीज पडून सातजण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या जखमींमध्ये 2 प्रौढ व 5 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे









